गुजरातमध्ये भाजपलाच बहुमत मिळणार - विजय रुपानी

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी लागणार आहेत. या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Dec 17, 2017, 09:12 PM IST
गुजरातमध्ये भाजपलाच बहुमत मिळणार - विजय रुपानी title=

राजकोट : गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी लागणार आहेत. या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी व्यक्त केला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. बहुमतानं भाजपच पुन्हा सत्तेवर येईल, असं रुपानी यांनी म्हटलंय.

दरम्यान, मतदानासंपल्यानंतर विविध चॅनल्स आणि एजन्सीने जाहीर केलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपलाच बहूमत मिळणार असून एकहाती सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांचे निकाल लावण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केलीय. ३३ शहरांमध्ये निवडणूक आयोगाची कंट्रोल रूम असणार आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये यंदा सरासरी ७५ टक्के मतदान झालंय. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे.

पुन्हा भाजपचीच सत्ता येणार - विजय रुपानी