हार्दिक पटेलच्या आणखी ५ सेक्स सीडी जारी

गुजरात निवडणूकीत अतिशय चुरस पाहायला मिळत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 7, 2017, 03:07 PM IST
हार्दिक पटेलच्या आणखी ५ सेक्स सीडी जारी

अहमदाबाद : गुजरात निवडणूकीत अतिशय चुरस पाहायला मिळत आहे. 

पाटीदार नेता हार्दिक पटेलचे नवे ५ सेक्स व्हिडिओ समोर आले आहेत. हा व्हिडिओ जाहीर होताच पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि भाजपच्यामध्ये आरोप - प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. 

द टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आथा तिसरा व्हिडिओ सेट जारी झाला आहे. गेल्या महिन्यात याचसारखे दोन व्हिडिओ लीक झाले होते. यासारखा व्हिडिओ पहिल्यांदा जाहीर झाला तेव्हा हार्दिक पटलेने याला खोटं ठरवत भाजपवर आरोप केले होते. आणि म्हटलं होतं की, माहित नाही भाजपने यासरखे व्हिडिओ फार लवकर जाहीर केले. यासारखे व्हिडिओ तर निवडणूकीच्या पाच ते सहा दिवस अगोदर जाहीर केले जातात. तसेच हार्दिक पटेल हे देखील म्हणाला होता की, भाजप आगामी काळात मला बदनाम करण्यासाठी खास प्रयत्न करेल. 

पाटीदार समाजाचं काय आहे म्हणणं? 

या व्हिडिओ असा आरोप आहे की, हार्दिक आणि दोन लोकं एका मुलीसोबत दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्लिपमध्ये ते दोन मुलं निघून जातात आणि रूमची लाईट बंद होते. त्यानंतर काळोख असल्यामुळे काहीच दिसत नाही. पासचे संयोजक दिनेश बंभाणिया यांचा आरोप असा आहे की, भाजपने छेडछाड करून हा व्हिडिओ तयार केला आहे. आम्ही सतत सांगत आहोत की, भाजप हार्दिकला बदनाम करण्यासाठी हे खोटे व्हिडिओ तयार करत आहे. तसेच आम्ही मीडियाला विनंती करतो की अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांनी दाखवू नका. आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देऊन आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close