FB Live करत या व्यक्तीने वाचवले अपहरण झालेल्या तरुणीचे प्राण

गुडगाव येथे भर रस्त्यात एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं. यानंतर एका तरुणाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि फेसबूक लाइव्ह करत पोलिसांची मदत घेतली. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 19, 2017, 05:35 PM IST
FB Live करत या व्यक्तीने वाचवले अपहरण झालेल्या तरुणीचे प्राण title=

नवी दिल्ली : गुडगाव येथे भर रस्त्यात एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं. यानंतर एका तरुणाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि फेसबूक लाइव्ह करत पोलिसांची मदत घेतली. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

गुडगाव येथून एका काही तरुणांनी एका तरुणीचं अपहरण केलं आणि तेथून पसार झाले. हे पाहिल्यानंतर एका तरुणाने आपल्या गाडीने आरोपींच्या गाडीचा पाठलाग केला आणि फेसबूक लाइव्ह करत इतरांपर्यंतही ही धक्कादायक घटना पोहोचवली.  आरोपींचा पाठलाग करत असताना या तरुणाने पोलिसांनाही कळवलं. मात्र, १२ किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं. 

बॉबी कटारिया नावाच्या व्यक्तीने या घटनेचं फेसबूक लाइव्ह केलं. फेसबूकवर हा व्हिडिओ तब्बल तीन लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.  

व्हिडिओत होत असलेली चर्चा आणि फेसबूक पोस्टमध्ये करण्यात आलेल्या कमेंट्स यावरुन स्पष्ट होतं की, बॉबी रस्त्याने जात होता त्याच दरम्यान काही तरुणांनी एका मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर त्या मुलीला सफेद रंगाच्या एसयूव्ही कारमध्ये घेऊन गेले. 

या घटनेची माहिती बॉबीने पोलिसांनाही दिली आणि आपल्या गाडीतूनच पोलिसांना घेऊन आरोपींचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. फेसबूक लाइव्ह करत असताना बॉबीने पोलिसांना आरोपींची गाडी थांबविण्यास सांगितलं मात्र, आपल्याकडे बंदूक नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

बॉबीने पोलिसांना घेऊन आरोपींच्या गाडीचा जवळपास १२ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यावेळी रस्त्यात तीन पोलीस चेकपोस्टही मिळाले. मात्र, कुणीही आरोपींच्या गाडीला थांबवलं नाही. एका पोलिसाने या घटनेची माहिती इतर पोलिसांना वॉकी-टॉकीवरुन दिली. 

बॉबीने फेसबूकवर पोस्ट केलेल्या दुस-या पोस्टमध्ये तो अपहरण केलेल्या मुलीच्या कुटूंबियांसोबत दिसत आहे. पीडित मुलीच्या परिवाराने सांगितले की, ९-१० गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या मुलीचं अपहरण केलं. जवळपास तीन तासांनंतर आणि आरोपींच्या गाडीचा नंबर मिळाल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं. त्यामुळे बॉबी खुपच नाराज झाला. 

बॉबी आपल्या कारने गाडीचा पाठलाग करत असल्याचं आरोपींच्या लक्षात आलं. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला रस्त्यात उतरवलं आणि तेथून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाहीये.