हैदराबाद मशीद स्फोट प्रकरणात असीमानंदांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

स्वामी असीमानंद यांची निर्दोष सुटका

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 12:46 PM IST
हैदराबाद मशीद स्फोट प्रकरणात असीमानंदांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

हैदराबाद : हैदराबादमधील प्रसिद्ध मक्का मशीदमध्ये 2007 साली झालेल्या स्फोटातील प्रकरणात मुख्य आरोपी स्वामी असीमानंद यांची हैदराबादच्या नामपल्ली कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. त्यांच्या सोबतच इतर आरोपींची देखील निर्दोष सुटका करण्यात आली आहे. २००७ मधील या स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५८ जण या स्फोटात जखमी झाले होते. चौकशी दरम्यान एनआयएने असीमानंद आणि लक्ष्मण दास महाराज यांच्यासह अनेक नेत्यांना १९ नोव्हेंबर २०१० ला अटक करत त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी केलं होतं.

१८ मे २००७ साली नमाज सुरु असतांना दुपारी 1:25 वाजता पाईप बॉम्ब स्फोट झाला होता. हा स्फोट मोबाईलच्या मदतीने घडवून आणला होता. यामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तपासात समोर आलं होतं की, बॉम्ब हा संगमरमर बेंचच्या खाली लावण्यात आला होता. नमाज सुरु असतांना त्याला अॅक्टीव्ह केला गेला. या स्फोटादरम्यान हजारो लोकं मशीदमध्ये उपस्थित होते. मशीदमध्ये आणखी ३ बॉम्ब सापडले होते. या घटनेनंतर हैदराबादमध्ये लोकांनी प्रदर्शनं केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फायरिंग करावी लागली होती. ज्य़ामध्ये देखील लोकांचा मृत्यू झाला होता. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close