पदवीधर असाल तर इथे मिळेल सर्वात जास्त पगाराची नोकरी

मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. काहीतरी नवीन करण्याच्या हेतूने तरुण शिकत आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 12, 2017, 12:20 PM IST
पदवीधर असाल तर इथे मिळेल सर्वात जास्त पगाराची नोकरी title=

नवी दिल्ली : एखादा प्रोफेशनल कोर्स करुन नोकरीच्या शोधात असणारे अनेकजण आपल्या आसपास असतात. चांगली नोकरी मिळावी म्हणून भरमसाठ पैसे भरायलाही अनेक पालक तयार असतात. आपल्या पाल्य डॉक्टर, अभियंता किंवा सीए सारख्या व्यवसायात जावा अशी घरातील मंडळींची इच्छा असते. पण आता दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत. मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. प्रत्येक दिवस हा नव काही शिकण्याची संधी घेऊन येत आहे. काहीतरी नवीन करण्याच्या हेतूने तरुण शिकत आहेत. 

चांगल्या पगाराची हमी

मार्केटमध्येही असे कोर्स आले असून त्यानंतर चांगली कमाईही होत आहे.  रिलेशन थेरपिस्टपासून ते सोशल मीडिया मॅनेजरकपर्यंत असंख्य नोकऱ्या आपली वाट पाहत आहेत. यातील बहुतेक नोकऱ्या तर अशा आहेत की यासाठी व्यावसायिक पदवी किंवा उच्च पात्रतेची आवश्यकता नाही. पदवीधरही यामध्ये करिअर करु शकतात. या क्षेत्रांमध्येही प्रचंड कमाईची संधी असून आपण अशा  काही नोकर्यांबद्दल माहिती घेऊया ज्या जास्त पैसे मिळवून देतात.

अॅप डेव्हलपर

पात्रता : कमीतकमी पदवीधर आणि अॅप डेव्हलपमेंट कोर्स
पगार : दरमहा ५० हजार ते ५ लाख रुपये
अॅप डेव्हलपरला टेकच्या जगात प्रचंड मागणी आहे. सध्या, प्रत्येक नवीन कंपनी त्या अॅपशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या माहितीचे अॅप विकासक आणि अॅप डेव्हलपर लॉन्च करीत आहे. या क्षेत्रात यावर्षी भरपूर संधी उपलब्ध आहेत. आपण त्यासाठी पात्र असल्यास वेतन अधिक अपेक्षेपेक्षा अधिक मिळवू शकता.

सोशल मीडिया मॅनेजर

पात्रता: किमान पदवीधर
पगार : ३० हजार ते ३ लाख रुपये दरमहा
सध्याच्या दिवसात सोशल मीडिया मॅनेजरची प्रचंड मागणी आहे. कंपन्यांनाही सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही गरज वाटू लागली आहे. त्यामूळे कंपनीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेगळी टीम तयार केली जात आहे. ही टीम हॅंडल करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजरची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होत आहे.

टे‍क्‍निकल रायटर

पात्रता : किमान पदवीधर
पगार : ५० हजार ते १.७ लाख दरमहा

आपण रायटर किंवा कंटेंट रायटरबद्दल ऐकले असेल पण टेक्निकल रायटर हे पूर्णपणे वेगळे आहे. टेक्निकल रायटरलाही लिहावे लागते पण आयटी कंपनी आणि त्यांची टेक्नोलॉजी हा त्यांचा फोकस असतो. किंवा ते प्रोग्रामिंग कंपनीसाठी काम करतात. टेक्निकल रायटर्सना अडॉब, ऑरकल आणि त्याच्या संबंधित ब्रॅण्डची ची माहिती ठेवणे गरजेचे आहे.

एसइओ अॅनेलिस्ट

पात्रता : किमान पदवीधर
पगार : ३० हजार ते १ लाख रुपये दरमहा
एसइओचे पूर्ण नाव सर्च इंजिन ऑप्टीमायजेशन असे आहे. एसइओ कोणत्याही वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी महत्त्वाचा हिस्सा मानला जातो. कोणतीही वेबसाईट अथवा ब्लॉग गुगल, याहू सारख्या सर्च इंजिनच्या होमपेजवर सुरुवातीला दिसण्यामागे एसईओ असतो.

रिलेशनशिप थेरेपिस्‍ट

पात्रता : किमान पदवीधर
पगार : ३० हजार ते १ लाख रुपये दरमहा
पाश्चिमात्य देशात रिलेशनशिप थेरेपिस्‍ट या प्रोफेशनची खूप मोठी मागणी आहे.
भारतात अगदी अलीकडे याची मागणी सुरु झाली आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.  जोडीदाराच्या नातेसंबंधास दृढ करणे हा रिलेशनशिप थेरेपिस्‍ट या कामाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त, नातेसंबंधात कटुता आली असल्यास रिलेशनशिप थेरेपिस्‍ट मदत करतात.