दोन महिला, अश्लिल व्हिडिओ; जाळ्यात अडकला वायूदलाचा ग्रुप कॅप्टन

वायू दलाचा दलाचा ग्रुप कॅप्टन अरूण मारवाहच्या हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, दोन महिलांनी अॅडल्ट वेबसाईट्सवरून डाऊनलोड केलेले पाच व्हिडिओ मारवाहला पाठवले होते. फेसबुकच्या माध्यमातून मारवाह या दोन महिलांच्या संपर्कात आला होता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 18, 2018, 11:12 AM IST
दोन महिला, अश्लिल व्हिडिओ; जाळ्यात अडकला वायूदलाचा ग्रुप कॅप्टन title=

नवी दिल्ली : वायू दलाचा दलाचा ग्रुप कॅप्टन अरूण मारवाहच्या हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, दोन महिलांनी अॅडल्ट वेबसाईट्सवरून डाऊनलोड केलेले पाच व्हिडिओ मारवाहला पाठवले होते. फेसबुकच्या माध्यमातून मारवाह या दोन महिलांच्या संपर्कात आला होता.

गुप्त माहिती फोडल्याच मारवाहवर आरोप

असेही सांगितले जात आहे की, या महिला पाकिस्तानच्या हस्तक आहेत. पाकची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर या महिला काम करत होत्या. मारवाहवर आरोप आहे की, या महिलांच्या जाळ्यात फसून त्याने देश, लष्कर आणि इतर तपासातील गुप्त माहिती या महिलांना दिली. पोलिसांनी जेव्हा मारवाहकडे व्हिडिओबाबत चौकशी केली. तेव्हा, त्याने सांगितले की हे दोन्ही व्हिडिओ त्या महिलांनीच पाठवले आहेत.

चौकशी अधिकाऱ्यांनी फेसबुककडे मागीतला तपशील

दरम्यान, चौकशी अधिकाऱ्यांनी या महिलांच्या खात्याचे आयपी अॅड्रेस फेसबुककडे मागितल्याचेही पोलिसांनी सांगीतले आहे. तसेच, या महिलांनी हे फेसबुक खाते केव्हा आणि कोठून सुरू केले होते याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती मागवल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

केरळच्या असाईन्मेंटसाठी गेल्यावर अडकला जाळ्यात

कार्यालयीन गुप्तता कायद्यांतर्गत चौकशी करत असले्या अधिकाऱ्यांनी फेसबुककडे संबंधीत महिलांनी डिलिट केलेले संदेशही मागवले आहेत. दरम्यान, मारवाहला दिल्ली न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी मारवाहच्या घरीही छापेमारी केली. यात एक पेन ड्राईव्ह काही सीडी जप्त करण्यात आल्या. त्या फॉरेन्सीक लॅबकडे पाठविण्यात आल्या आहेत. मारवाहने पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका असाईन्मेंटसाठी केरळला गेलो असता एका महिलेशी आपला संपर्क आला. तिने आपल्याला फेसबुक मेसेंजरशी जोडून घेतले.