चक्क साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावली

मॅरेथॉन म्हटलं की, आपल्या समोर येतं ते टी शर्ट आणि शॉर्टमधली लोकं. पण जर एखादी स्त्री जर साडी नेसून आली तर... थोडं चकित झालात ना. पण हैदराबादमध्ये एका महिलेने हा कारनामा करुन दाखवला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 22, 2017, 06:11 PM IST
चक्क साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावली title=

हैदराबाद : मॅरेथॉन म्हटलं की, आपल्या समोर येतं ते टी शर्ट आणि शॉर्टमधली लोकं. पण जर एखादी स्त्री जर साडी नेसून आली तर... थोडं चकित झालात ना. पण हैदराबादमध्ये एका महिलेने हा कारनामा करुन दाखवला आहे. 

ही महिला फक्त साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली नाही, तर ४२  किमी अंतर पुर्णही केलं. जयंती संपत कुमार असं या महिलेचं नाव आहे. संपुर्ण मॅरेथॉन पार पडेपर्यंत सर्वाचं लक्ष फक्त तिच्याकडेच लागलं होतं. हैदराबादमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉनमध्ये २० हजार लोक सहभागी झाले होते. जयंती संपत कुमारही त्यांच्यातील एक होती. जयंती अत्यंत पारंपारिक पद्धतीत साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी आली होती. अनेकांना तिला पाहून आश्चर्य वाटत होतं. यामागंच नेमक कारण जयंतीने मॅरेथॉन पूर्ण केल्यावर सांगितलं. हातमाग वस्त्रांचं प्रमोशन करण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो असल्याचं तिने सांगितलं. जयंतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही अर्ज केला आहे. 

'हा एक मस्त अनुभव होता. अनेकांना माझ्याकडे पाहून कुतुहूल वाटत होतं. त्यांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायची होती', असं जयंतीने सांगितलं आहे. मी एक सायकलिस्ट असून अनेकदा फिरायला जात असते. यावेळी रस्त्यावर साचणारं प्लास्टिक पाहून प्रदूषण किती वाढलं आहे याची कल्पना येते. ही संधी साधत मला त्याचाही निषेध करायचा आहे. त्यासाठी कदाचित मी प्लास्टिकने बनवलेली साडी नेसून धावायला हवं'. जयंती यांनी पायातही शूज न घालता सँडल घातल्या होत्या. याबद्दल तिने सांगितलं की, 'मला उघड्या पायांनी धावायचं होतं, ज्यामुळे मला वेग मिळाला असता. पण दगडं पायाला लागून जखम होईल म्हणून मी सँडल घालायचं ठरवलं'.

साडी नेसलेली असतानाही इतक्या कमी वेळात मॅरेथॉन पुर्ण केल्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही जयंतीने अर्ज केला आहे. 'मी त्यांना याबद्दल माहिती दिली होती. मला जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते पुरावा म्हणून त्यांना पाठवण्यात येईल.