पनामानंतर 'पॅराडाइज पेपर्स' घोटाळा, ७१४ भारतीयांची नावे

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचाला काहीच दिवस उरलेले असताना काळ्या पैशांबाबत एक मोठा खुलासा झालाय.

Updated: Nov 6, 2017, 01:01 PM IST
पनामानंतर 'पॅराडाइज पेपर्स' घोटाळा, ७१४ भारतीयांची नावे title=

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचाला काहीच दिवस उरलेले असताना काळ्या पैशांबाबत एक मोठा खुलासा झालाय. हा खुलासा जर्मनीच्या जीटॉयचे साइटुंग नावाच्या वृत्तपत्राने केला असून याच वृत्तपत्राने १८ महिन्यांआधी पनामा पेपर्सचा खुलासा केला होता. ९६ मीडिया ऑर्गनायझेशनसोबत मिळून इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्टने ‘पॅराडाईज पेपर्स’ नावाच्या कागदपत्रांची चौकशी केली आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये १.३४ कोटी कागदपत्रे आहेत. या खुलाशातून त्या कंपन्यांबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्या जगभरातील श्रीमंत लोकांचा पैसा  विदेशात पाठवण्यास त्यांना मदत करतात. पनामासारखेच यातही अनेक भारतीय नेत्यांची, अभिनेत्यांची आणि उद्योगपतींचं नावे आली आहेत.

इंडियन एक्सप्रेसनुसार, या यादीत एकूण ७१४ भारतीयांची नावे आहेत. तेच जगातल्या १८० देशांचे नाव या यादीत आहेत. या यादीत भारत १९व्या क्रमांकावर आहे. ज्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आली, त्यात सर्वात जास्त बरमूडाच्या लॉ फर्म अ‍ॅपलबायच्या कागदपत्रांचा आहे. ११९ वर्ष जूनी ही कंपनी वकील, अकांऊट्न्ट्स, बॅंकर्स आणि इतर लोकांच्या नेटवर्कची सदस्य आहे. या नेटवर्कमध्ये त्याही लोकांचा समावेश आहे जे आपल्या क्लाएंट्ससाठी परदेशी कंपन्यांमध्ये सेटींग करतात. 

या भारतीयांची नावे -

या खुलाशातून सध्या केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्री जयंत सिन्हा आणि बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचेही समोर आले आहे. या यादीत अमिताभ बच्चन यांचे बरमूडातील एका कंपनीत शेअर्स असल्याचाही खुलासा झाला आहे. यासोबतच राज्यसभा सदस्य आणि उद्योगपती आरके सिन्हा यांच्या एसआयएस सिक्यॉरिटीज यांनी कंपनीचंही नाव समोर आलंय. तसेच पॅराडाईज पेपर लीकमध्ये अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्तचा आधीचा पती दिलनशीं याचंही नाव आहे. त्यासोबतच विजय माल्ल्या, निरा राडीया यांचीही नावे यात आहेत.