आता प्रत्येक मोबाईल ग्राहकांना मिळणार 'क्रेडिट कार्ड', या बँकेने सुरु केली सुविधा

अनेक प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळत नाहीये? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

Updated: May 17, 2018, 07:33 PM IST
आता प्रत्येक मोबाईल ग्राहकांना मिळणार 'क्रेडिट कार्ड', या बँकेने सुरु केली सुविधा

नवी दिल्ली : अनेक प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळत नाहीये? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. होय, मुंबईतील इंस्टेंट क्रेडिट फेसिलेटिंग स्टार्टअप ईपेलेटर (ePayLater) ने प्रायव्हेट क्षेत्रातील आयडीएफसी बँकेसोबत करार केला आहे. यानुसार, भीम, यूपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट लिमिट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ईपेलेटरतर्फे ग्राहकांना अशा आऊटलेटवर क्रेडिट पेमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे युपीआय पेमेंट किंवा भारत क्यूआर पेमेंटवरुन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

देशात ३.५ कोटी क्रेडिट कार्ड धारक

ईपेलेटरचे को-फाऊंडर आरको भट्टाचार्य यांनी सांगितले की, देशात ३.५ कोटी क्रेडिट कार्ड धारक आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना लहान क्रेडिट लिमिटचा वापर करत काही व्यवहार करायचे असतील तर ते ईपेलेटरचा वापर करुन करु शकणार आहेत. भट्टाचार्य यांनी सांगितले की, ईपेलेटरच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या पेमेंटचं रि-पेमेंट १४ दिवसांत करावं लागणार आहे. यासाठी ईपेलेटरने आयडीएफसी बँकेसोबत करार केला आहे.

२० हजार रुपयांची क्रेडिट सुविधा

या अंतर्गत भीम यूपीआयचा वापर करणारे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी क्रेडिट उलब्ध करु देण्यात येईल. एका हिंदी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एकावेळेस २० हजार रुपयांपर्यंत क्रेडिटची खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे.

या संदर्भात आयडीएफसी बँकेचे सीओओ अवतार मोंगा यांनी म्हटलं की, नोटबंदी नंतर पेमेंट करण्यासाठी ग्राहकांकडे क्रेडिट कार्डच्या व्यतिरिक्त अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आहेत आणि वेगाने होत आहेत. 

ज्या ग्राहकांना बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळत नाहीयेत अशा ग्राहकांसाठी आयडीएफसी बँकेकडून ईपेलेटरची सुविधा मिळत आहे. यामध्ये भीम यूपीआयला कस्टमाईज करण्यात आलं आहे. ज्यामुळे भीम अॅपच्या युजर्सला डिजिटल क्रेडिट उपलब्ध करण्यात येईल.

क्रेडिट लिमिटचा असा करा वापर

यासाठी ग्राहकांना सर्वातआधी ईपेलेटर अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. युजर्ससाठी क्रेडेंशिअलच्या आधारावर एक निश्चित कर्ज व्यवस्था ठरवण्यात आली आहे. याच्या आधारे युजर्स आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करु शकणार आहेत. मात्र, याचं पेमेंट ग्राहकांना १४ दिवसांच्या आत करावं लागणार आहे. १४ दिवस वापरण्यात आलेल्या रक्कमेवर कुठल्याही प्रकारचा व्याज लागणार नाहीये. १४ दिवसांनंतर ३ टक्के प्रति महिना या दराने व्याज द्यावा लागणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close