अहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी

जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.

Updated: Sep 14, 2017, 05:01 PM IST
अहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी title=

अहमदाबाद : जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.

मोदींच्या म्हणण्यानुसार, बुलेट ट्रेन असा प्रोजेक्ट आहे जो गती, प्रगती, सुपरफास्ट टेक्नोलॉजीच्या माध्यमातून तेज परिणाम करणारा असेल. यामध्ये सुविधाही आहे आणि सुरक्षाही. हा प्रोजेक्ट रोजगारही उपलब्ध करेल आणि गतीही... ह्युमन फ्रेंडली आणि इको फ्रेंडली असा हा प्रोजेक्ट असेल. या माध्यमातून आपणचं भारताचा खरा मित्र आहे, हेच जपाननं दाखवून दिलंय.

०.१ टक्के व्याजदरानं कर्ज

ही बुलेट ट्रेन भारताला जवळपास फुकटातच मिळत असल्याचं पंतप्रधान मोदींचं म्हणणं आहे. 'एखादी व्यक्ती बाईक खरेदी करत असेल तरी तो १० बँकांच्या फेऱ्या मारतो... आणि कुणी अर्धा टक्के कमी व्याजदरानं कर्ज दिलं तरी तो खुश होतो. असा एखादा मित्र किंवा बँक मिळेल की जो मोफत कर्ज द्यायला तयार होईल? आणइ तेही ८८ हजार करोड रुपयांचं कर्ज... भारताला जपान आणि शिंजो आबेसारखे मित्र मिळालेत... कारण भारताला ८८ हजार करोड रुपयांचं कर्ज केवळ ०.१ टक्के व्याजदरानं मिळालंय. म्हणजे हा प्रोजेक्ट मोफतच बनतोय' असं मोदींनी म्हटलंय.