सुखोई फायटर जेटने भारताने पहिल्यादाच केली ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी

सीमा पार जात शत्रूच्या इलाक्यात घुसून अचूक लक्षभेद करणे हे ब्राम्होस क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य. याच ब्राम्होसचे सुखोई फायटर जेटच्या माध्यमातून चाचणी बुधवारी करण्यात आली. भारताने अशा प्रकारचे चाचणी पहिल्यांदाच केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 22, 2017, 04:10 PM IST
 सुखोई फायटर जेटने भारताने पहिल्यादाच केली ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी title=

नवी दिल्ली : सीमा पार जात शत्रूच्या इलाक्यात घुसून अचूक लक्षभेद करणे हे ब्राम्होस क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य. याच ब्राम्होसचे सुखोई फायटर जेटच्या माध्यमातून चाचणी बुधवारी करण्यात आली. भारताने अशा प्रकारचे चाचणी पहिल्यांदाच केली.

आवाजाच्या गतीपेक्षा तीप्पट वेग

आवाजाच्या गतीपेक्षाही तीन पटींनी अदिक म्हणजेच 2.8 माक वेगाने गती पकडने हे ब्राम्होसचे खास वैशिष्ट्या आहे. इतक्या वेगवान क्षेपणास्त्राचे चाचणी करणे तसे आव्हान होते. मात्र, सुखोई-30 एमकेआय फायटर जेटच्या मदतीने यशस्वीरित्या पेलले. फायटर जेटच्या माध्यमातून सक्षम ब्राम्होसचे चाचणी हे एक 'डेडली कॉम्बिनेशन' असल्याचे सांगितले जात आहे. हवेतून जमीनीवर मारा करण्याची क्षमता ठेवणारे हे क्षेपणास्त्र शत्रूचे तळ, दहशतवाद्यांचे अड्डे उदद्ध्वस्त करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते.

शत्रूचे बंकर आणि दहशतवाद्यांचे अड्डे करणार उदद्धवस्त

अंडरग्राउंड अण्वस्त्र बंकर, कमांड अॅण्ड कंट्रोल सेटर्स  आणि खोल समुद्रावरून उडणारे एअरक्राफ्टसवर दूर अंतरावरून निशाणा साधण्यासाठी हे क्षेपणास्त्र कामी येते. गेल्या दशकात भारतीय लष्कराने 290 किलोमीटरच्या रेंजमध्ये जमीनीवरून मारा करणाऱ्या ब्राम्होसला आपल्या ताफ्यात केव्हाच सामिल केरून घेतले आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्रासाठी 27,150 कोटी रूपयांची ऑर्डर देण्यात आली आहे.

भारताच्या लष्करी ताकदीमध्ये वाढ

जून 2016 मध्ये 34 देशांच्या क्षेपणास्त्र टेक्नॉलजी कंट्रोल रिजीम संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्रांच्या सीमेवर असलेली भारताची बंधनेही निकालात निघाली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता ब ब्राम्होस 450 किलोमिटर रेंज पर्यंत मारा करणारऱ्या व्हर्जनची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमुळे भारताची ताकद वाढली आहे.