आयकर विभागाच्या रडारवर बिटकॉईन एक्सचेंज

बिटकॉन एक्सचेंजवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 13, 2017, 04:54 PM IST
आयकर विभागाच्या रडारवर बिटकॉईन एक्सचेंज title=

नवी दिल्ली : बिटकॉन एक्सचेंजवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, कोची आणि गुरुग्राम सह ९ जागेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. कर चोरीच्या बाबतीत ही कारवाई केल्याचं बोललं जातं आहे.

या कारवाईचा उद्देश गुंतवणुकदार आणि व्यापाऱ्यांची ओळख, त्यांच्याद्वारे केलेले व्यवहार, वापरले जाणारे बँक खाते याची माहिती घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. न्यूज २४ ने दिलेल्या बातमीनुसार या छाप्यांमध्ये या पथकाने विविध प्रकारचा आर्थिक डेटा आणि व्यवहारांचा तपशील गोळा केला आहे.

देशातील बिटकॉईनच्या विरोधातील ही पहिली मोठी कारवाई आहे, असे म्हटले जात आहे. बिटकॉईन एक व्हर्च्युअल चलन आहे. देशात याचा वापर नाही होत. त्याच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील मध्यवर्ती बँका चिंतेत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने असे चलन ठेवणाऱ्या लोकांना सावधान केलं आहे.