५० आणि २०० रूपयाच्या नोटांबाबत निर्माण झाला पेच, सरकार उचलणार हे पाऊल

८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारच्या नोटाबंदी आदेशानंतर सिक्युरिटी प्रिंटींग अ‍ॅन्ड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मध्य प्रदेशातील देवास येथील यूनिटमध्ये केवळ ५०० च्या नोटा छापल्या जात आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 20, 2018, 05:15 PM IST
५० आणि २०० रूपयाच्या नोटांबाबत निर्माण झाला पेच, सरकार उचलणार हे पाऊल title=

देवास : ८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारच्या नोटाबंदी आदेशानंतर सिक्युरिटी प्रिंटींग अ‍ॅन्ड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मध्य प्रदेशातील देवास येथील यूनिटमध्ये केवळ ५०० च्या नोटा छापल्या जात आहेत. 

जनरली एसपीएमसीआयएलच्या या यूनिटमध्ये २०, ५०, १०० आणि ५०० रूपयांच्या नोटा छापल्या जातात. मात्र त्यावेळी देशात ५०० च्या नोटांची डिमांड जास्त होती, त्यामुळे येथील सर्वच मशीनवर आता ५०० रूपयांच्या नोटांची छपाई सुरू होती. असे मानले जात आहे की, जर २०० आणि १००० हजारच्या नोटांना मंजूरी मिळाली तर देशातील नोटांची टंचाई दूर करण्यात देवासची बॅंक नोट प्रेस एकदा पुन्हा महत्वपूर्ण भूमिका साकारू शकते. 

५० आणि २०० च्या नोटांबाबत निर्माण झाला पेच

जर तुम्हाला बॅंकेत जाऊन ५० आणि २०० रूपयांच्या नोटा घ्यायच्या असतील तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. येणा-या दिवसात अशीही परिस्थीती निर्माण होऊ शकते की, या दोन्ही नोटा बंद केल्या जाऊ शकतात. झालं असं की, अधिवक्ता अमृतांशू बडथ्वाल आणि रोहित डंडरियाल यांनी आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या ५० रूपयाच्या नोटेवर दृष्टीहीनांसाठी कोणतही चिन्ह नसण्यावर आवाज उठवला आहे. दोघांनीही दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीये. कोर्टाने बॅंकेला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. 

एटीएममधून खोटी नोट

नोटाबंदीनंतर १००० आणि ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बॅंकांमध्ये २ हजार आणि ५०० च्या नव्या नोटा मिळणे सुरू झाले. नोटाबंदीच्या तडाख्यातून नागरिक बाहेर आलेही नव्हते की, सरकारपुढे खोट्या नोटांची समस्या उभी राहिली. मध्यप्रदेशात खोट्या नोटा मिळण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

एमपीमध्ये अनेक प्रकरण आली समोर

नुकत्याच मध्यप्रदेशात खोट्य नोटा पकडण्यात आल्याची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. पकडण्यात आलेल्या नोटांची तपासणी करण्यात आल्यावर असे लक्षात आले की, २००० हजार रूपयांच्या नोटांच्या १७ फीचर्सपैकी ११ सिक्युरिटी फीचर्सची नकल केली गेली. आता ही समस्या दूर करण्यासाठी सरकार एक असा मार्ग काढणार आहे, ज्यातून खोट्या नोटांवर पूर्णपणे लगाम लावली जाईल.