पाच नव्या ट्रेनसोबत रेल्वे जाहीर करणार नवे वेळापत्रक

पाहा नवे वेळापत्रक 

पाच नव्या ट्रेनसोबत रेल्वे जाहीर करणार नवे वेळापत्रक  title=

मुंबई : बुधवारी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी रेल्वे आपल्या नवी वेळापत्रकाची घोषणा घेऊन येणार आहे. तसेच पुढील 12 महिन्यत रेल्वे अंत्योदय, उदय, तेजस सारख्या आणखी पाच नव्या एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहेत. रेल्वेने मंगळवारी सांगितलं की, रेल्वेने 'ट्रेन एट ए ग्लांस' मध्ये अंत्योदय एक्सप्रेस, दो तेजस एक्सप्रेस आणि दोन उदय एक्सप्रेस यांचा समावेश घेतला आहे. अंत्योदय एक्सप्रेसचे सर्व कोच सामान्य श्रेणी आणि रिझरवेशन नसणारे असणार आहे. 

तर तेजस एक्सप्रेस देशातील पहिली हायस्पीड पूर्ण वातानुकूलित ट्रेन आहे. तर उदय एक्सप्रेस डबल डेकर एसी चेअर कार ट्रेन आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाच नवीन ट्रेनचा समावेश करून नवीन वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आशा आहे की हे वेळापत्रक लवकरच सुरू होईल. रेल्वेने या अगोदरच 23 हमसफर एक्सप्रेस, 10 अंत्योदय एक्सप्रेस, 1 तेजस एक्सप्रेस,1  उदय एक्सप्रेसची सुरूवात झाली आहे. आणि आता या ट्रेनला नव्या वेळापत्रकात सहभागी करून घेणार आहे.