आता सरकारी कार्यालय आणि शेतात काम करणार रोबोट

जयपूरमध्ये आयटी डे च्या निमित्ताने राज्यातील संचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने आयटी एक्सपोचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात आकर्षणाचं केंद्र ठरलं ते म्हणजे रोबोट्स...

Sunil Desale Updated: Mar 22, 2018, 10:10 PM IST
आता सरकारी कार्यालय आणि शेतात काम करणार रोबोट title=

नवी दिल्ली : जयपूरमध्ये आयटी डे च्या निमित्ताने राज्यातील संचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने आयटी एक्सपोचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात आकर्षणाचं केंद्र ठरलं ते म्हणजे रोबोट्स...

रोबोटने वेधलं सर्वांचं लक्ष

रविवार पासून सुरु झालेल्या चार दिवसीय आयटी मेळाव्यात देशभरातील जवळपास १०० तंत्रज्ञान कंपन्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात रोबोट्सने सर्वांचचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. 

काय काय करणार रोबोट्स

असं म्हटलं जात आहे की, रोबोट्स येत्या काळात सरकारी कार्यालयांत काम करताना पहायला मिळणार आहेत. यासोबतच पर्यटकांना पर्यटन स्थळांच्या बाबतीतही संपूर्ण माहिती देतील. इतकचं नाही तर, हे रोबोट्स शेतातही काम करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या भव्य आयटी एक्सपोचं आयोजन जयपूरमधील कॉमर्स कॉलेज आणि जवाहर कला केंद्रात आयोजित करण्यात आलं होतं.

आयटी विभागाचे प्रमुख सचिव अखिल अरोडा यांनी माहिती दिली की, राज्य सरकारने पाच असे रोबोट्स खरेदी केले आहेत जे सरकारी कार्यालयात तैनात करण्यात येणार आहेत. अखिल यांनी सांगितले की, हे रोबोट्स सरकारी कार्यालयांतील खिडक्यांवर थेट नागरिकांशी संवाद साधून सरकारी योजनांची माहिती देणार आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहचवण्याचं काम करणार आहेत.

टूरिस्ट गाईड बनणार रोबोट

हे रोबोट्स टूरिस्ट गाईडचंही काम करणार आहेत. 'चौट बोट' नावाचा रोबोट पर्यटन स्थळाचे फोटो पाहून त्याची संपूर्ण माहिती देण्याचं काम करणार आहे. सध्या हे रोबोट्स एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत आणि कंपन्यांचे प्रतिनिधी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत आहेत.

शेतातही काम करणार रोबोट?

मिळालेल्या माहितीनुसार, आयटी विभाग या रोबोट्सला शेतीची माहिती देऊन काम करण्याच्या तयारीला लागलं आहे. तसेच हे रोबोट स्मारकांचे फोटोज पाहून त्यांचा इतिहासही सांगणार आहेत. संचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने असे काही रोबोट्स खरेदी केले आहेत. या रोबोट्समध्ये मशीन फेस, स्पीच आणि वॉईस रेकग्नाइजर सिस्टम देण्यात आली आहे.