पाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 13, 2017, 10:28 PM IST
पाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि पुंछमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी सुमारे सव्वा तीनच्या सुमारास अखनूर क्षेत्रातील ब्राम्हण बेला आणि रायपूर सीमेवरच्या चौक्यांवर छोट्या हत्यारांनी हल्ला केला. तसेच, काही मोठ्या हत्यारांनीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र, कोणत्याही प्रकारे गोळीबार सुरू असल्याचे चिन्ह नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानकडून शंस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडल्या आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close