पुलवामात सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक, पोलीस अधिकारी जखमी

खबरदारी म्हणून क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्यात

Updated: Oct 11, 2018, 11:45 AM IST
पुलवामात सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक, पोलीस अधिकारी जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी पार पडलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) जखमी झालेत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एसपीओ बिलाल अहमद यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं कुपवाडाच्या हंदवाडा तहसीलच्या बटगुंड गावात एक सर्च ऑपरेशन सुरु केलं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारी म्हणून क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्यात... तसंच जिल्ह्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आलीय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close