एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

Last Updated: Sunday, August 13, 2017 - 10:21
एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

नवी दिल्ली : जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी शनिवारी म्हटलं की, पक्ष पटनामध्ये 19 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत यासाठी मंजुरी देईल. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची अध्यक्षता पक्ष प्रमुख नितीश कुमार करतील. या दरम्यान एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा केली जाईल.

याआधी भाजप अध्यक्षांनी शनिवारी ट्विट करत म्हटलं होतं की, मी शुक्रवारी जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमारांना भेटलो. त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. तर सूत्रांनी सांगितलं की, मोदी सरकारमध्ये होणाऱ्या फेरबदल्याच्या पार्श्वभूमीवर जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होईल.

केंद्र सरकारमध्ये देखील सहभागी होण्याच्या प्रश्नावर त्यागी यांनी म्हटलं की, 'जर आम्ही बिहारमध्ये सत्तेत एकत्र आहोत तर साहजिकच केंद्रातही एकत्र राहू.'

First Published: Sunday, August 13, 2017 - 10:21
comments powered by Disqus