कर्नाटकात कुमारस्वामींची कसोटी; आज बहुमत ठराव, अध्यक्ष निवडीकडे लक्ष

  एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2018, 08:32 AM IST
कर्नाटकात कुमारस्वामींची कसोटी; आज बहुमत ठराव, अध्यक्ष निवडीकडे लक्ष title=

बंगळुरु : जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून रमेशकुमार यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे बहुमताबरोबरच अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे लक्ष लागलेय. तर दुसरीकडे भाजपने कुमारस्वामी गर्विष्ठ असल्याचा आरोप केलाय.  तसेच काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनीही सरकारबाबत भाष्य केल्याने बहुमताआधीच वेगळे संकेत दिलेत. त्यामुळे कुमारस्वामी यांची आजपासून खरी कसोटी लागणार आहे.

Kumaraswamy to take oath as Karnataka CM: Why anti-BJP leaders are expected as audience

दरम्यान, याआधी भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला प्रथम संधी देऊनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे राज्यपाल यांनी कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, परवा त्यांच्या शपथविधीदरम्यान २०१९ लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी, भाजपविरोधी महाआघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

BS Yeddyurappa: Seasoned oarsman who failed to anchor BJP boat in Karnataka

तर दुसरीकडे भाजपने आघाडी सरकावर टीका केलेय. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे वर्तन गर्विष्ठ व निरंकुश प्रकारचे आहेत. त्यांचा कॉंग्रेस पक्षावर काडीचा विश्वास नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून रमेशकुमार यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेस व जनता दलाने ११७ सदस्यांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. अध्यक्षपद व विश्वासदर्शक ठरावाववर आज शुक्रवारी मतदान होणार आहे.

कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परवा केवळ दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. आज विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, काल कर्नाटमध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटल्याचे चित्र दिसून आले. यावेळी भाजप आणि नरेंद्र मोदी विरोधकांनी एका व्यासपीठावर येत हम साथ साथ है असल्याचे दाखवून दिले. शक्तिप्रदर्शनानंतरही विरोधकांची महाआघाडी बनणार नसल्याचे संकेत मिळतायत. माकपचे सचचिटणीस सीताराम येचुरी यांनी याबाबत संकेत दिलेत. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांच्या एकीच्या नावाखाली तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी हात मिळवण्याचा प्रश्नच नाही, असा सवाल येचुरी यांनी उपस्थित केलाय.