निरमा विकण्यासाठी सायकलचा वापर, उभारला २७ हजार कोटींचा टर्नओव्हर

एक हजार किंवा त्याच्या आसपासच्या रकमेइतके पैसे गुंतवून सुरू झालेला हा उद्योग आज तब्बल २७,००० कोटी रूपयांचा टर्नओव्हर करतो.  

Updated: Aug 4, 2018, 07:06 PM IST
निरमा विकण्यासाठी सायकलचा वापर, उभारला २७ हजार कोटींचा टर्नओव्हर

मुंबई: तुम्हाला ८०चे दशक आठवतं का? त्या काळात रेडीओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांमध्येसुद्धा एक जाहिरात यायची. 'दूध सी सफेदी, निरमा से आई... वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा...' कपडे धुण्याचा साबण म्हणजे निरमा. हे जणून समिकरणचं. तर, ही जाहिरात अनेकांच्या आजही स्मरणात असेलं. अगदी निरम्याच्या पाकिटावर असलेल्या त्या छोट्या स्कर्टवाल्या मुलीसह. पण, तुम्हाला माहिती आहे का,केवळ १ हजार किंवा त्याच्या आसपासच्या रकमेइतके पैसे गुंतवून सुरू झालेला हा उद्योग आज तब्बल २७ हजार कोटी रूपयांचा टर्नओव्हर करतोयं. काय आहे या उद्योग समूह आणि त्याच्या मालकाची यशोगाथा घ्या जाणून.....

सरकारी नोकरी सोडून व्यवसायनिर्मिती

निरमा कंपनी आणि निरमाचा ब्रॅण्ड जनमानसात ठसवणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे नाव आहे करसनभाई पटेल. आज तुम्ही त्यांना नक्कीच एक श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती म्हणू शकता. पण, तो काळ त्यांच्यासाठी खूपच कठीण होता. ज्या काळात त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि स्वत: साबन, निरमा (कपडे धुण्याची पावडर) बनवून सायकलवरून विकण्यास सुरूवात केली. ते आपले उत्पादन घेऊन घराघरात तर पोहोचवत असतच. पण, त्याआधी त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे १००० रूपये इतके भांडवलही त्या काळात मीत्र, नातेवाईक आणि इतर मंडळींकडून हातउसने, कर्जाऊ अशा पद्धतीने घेतले होते. करसनभाई यांच्या यशाचा अंदाज तुम्ही एका  घटनेवरून लाऊ शकता. ती घटना म्हणजे हिंदुस्तान लीव्हरचे चेअरमन केके दादीसेठ यांनी अन्सर्ट अॅण्ड यंगद्वारा आजीनवर उजद्यमता पुरस्कारासाठी नाव सुचवले होते आणि त्यांच्याच हस्ते तो प्रदानही करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे हिंदूस्तान लिव्हर आणि निरमा या दोन्ही कंपन्या त्या काळी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जात.

रसायनशास्त्राचे अभ्यासक

सुमारे ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ साबन निर्मितीत लक्ष घातलेले करसनभाई पटेल हे रसायन विज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यांना रसायणांबाबत सखोल माहिती मिळाली आणि त्यांनी बाजारात मिळणाऱ्या प्रचलीत आणि महागड्या साबनांना टक्कर देणारा देसी साबन बनवला. साबननिर्मिती करण्यापूर्वी करसनभाईंनी कॉटन मिल आणि गुजरात सरकारच्या खनन आणि भूविज्ञान विभागात नोकरी केली होती. त्यांनी नोकरीला रामराम करून साबन व्यवसाय सुरू केला.

विविध क्षेत्रात उद्योग विस्तार..

सुरूवातीच्या काळात ते सायकलवरून साबन विकायचे. तसेच, ते लोकांच्या दारात जायचे पण, लोक त्यांना दाद द्यायचे नाहीत. शेवटी ते मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या घरी जायचे आणि त्यांना साबन विकायचे. मोठ्या मुश्किलीने ते महिन्याकाठी ५०० किलो साबन विकायचे. आज त्यांच्या कारखान्यातून प्रतिदिन सुमारे हजारो टन साबन तयार होतो.सुरूवातीच्या काळात अगदीच माफक स्वरूपात साबन बनवणाऱ्या करसनभाईंनी सीमेंट, पावडर, औषधे आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपला उद्योगविस्तार केला आहे.