कर्नाटक निवडणुकीनंतर कुमारस्वामींची पत्नी गुगलवर होतेय ट्रेंड

कोण आहे कुमारस्वामी यांची पत्नी...

Updated: May 19, 2018, 08:51 PM IST
कर्नाटक निवडणुकीनंतर कुमारस्वामींची पत्नी गुगलवर होतेय ट्रेंड title=

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर नाटकीय घटनाक्रम सुरु आहेत. शनिवारी विधानसभेमध्ये बहुमत चाचणी आधीच कुमारस्वामी यांची पत्नी राधिका कुमारस्वामी गूगलवर ट्रेंड होत आहे. राधिका कुमारस्वामी अभिनेत्री आहे. प्रोड्यूसर म्हणून देखील तिने काम केलं आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठा चेहरा आहे. 2006 मध्ये एचडी कुमारस्वामी यांच्या सोबत विवाह केल्यानंतर ती चर्चेत आली होती. दोघांना एक मुलगी देखील आहे जिचं नाव शमिका आहे.

कर्नाटक निवडणुकीनंतर देशात ही निवडणूक चर्चेत आहे. पण राधिका कुमारस्वामी देखील गुगलवर ट्रेंड करत आहे. अनेक लोकं राधिका बद्दल जाणून घ्यायला उत्सूक आहेत. राधिकाने 14 व्या वर्षी कन्नड सिनेमामध्ये काम केलं. रतन कुमार सोबत राधिकाचा पहिला विवाह झाला होता. त्या दरम्यान राधिकाच्या आईने आरोप केला होता की रतनने जबरदस्ती विवाह केला होता. राधिका तेव्हा फक्त 14 वर्षांची होती. राधिकाला जिवंत जाळण्याचा देखील रतनने प्रयत्न केल्याचा आरोप पित्याने केला होता. 2002 मध्ये  रतन कुमारचं हर्ट अॅटॅकने निधन झालं होतं.

 HD Kumaraswamy Wife Radhika Kumaraswamy Trending on google and social sites

राधिका काही वर्ष लाईमलाईटपासून दूर होती. 2010 मध्ये एचडी कुमारस्वामी सोबत विवाहाचा दावा तिने केला. 2006 मध्ये राधिकाचा विवाह झाला. असं तिने दावा केला होता.

HD Kumaraswamy Wife Radhika Kumaraswamy Trending on google and social sites