महापुरानंतर केरळवर आता रॅट फिवर आजाराचं संकट

केरळवर आणखी एक संकट

Updated: Sep 4, 2018, 09:42 AM IST
महापुरानंतर केरळवर आता रॅट फिवर आजाराचं संकट title=

तिरूअनंतपुरम : महापुराच्या भीषण संकटाचा सामना केल्यानंतर केरळवर आता नवं संकट उभं राहिलं आहे. रॅट फिवर नावाचा संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक जणांना याची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास २०० लोकांना या आजाराची लागण झाली आहे. दुषीत पाण्यामुळे या आजाराची लागण होत आहे. या आजाराला लेप्टोस्पायरोसिस असे देखील म्हणतात. अंगदुखी, ताप येणे अशी या आजाराची लक्षणं आहेत. केरळमध्ये आलेल्या महापुरानंतर अस्वच्छतेमुळे हा आजार पसरला आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु केले आहे. महापुरानंतर लेप्टोस्पायरोसिस तसेच टायफॉईड आणि कॉलरा सारख्या आजारांचा इशारा देखील देण्यात आला होता.