लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचा हनीमूनचा 'हा' फोटो व्हायरल

चांदी की सायकल, सोने की सीट...

लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचा हनीमूनचा 'हा' फोटो व्हायरल

मुंबई : ऐश्वर्या रायसोबत लग्न केलेला आरजेडी नेता आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव भरपूर खूष असल्याच दिसत आहे. त्याचा हा आनंद फोटोंतून व्यक्त होत आहे. सध्या सोशल मीडियावर तेज प्रताप यादव याचा पत्नीसह असलेला हनीमूनचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. 

तेज प्रताप यादवने स्वतः या फोटोला इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या फोटोत तेज प्रताप यादव सहपत्नी सायकलवर बसले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट करून चांगल्या प्रतिक्रिया देऊन शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 12 मे रोजी लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाचं तेज प्रताप यादव याच आरजेडी आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न झालं आहे. ऐश्वर्याला सायकलवरून घेऊन जाण्याअगोदर तेज प्रताप यादव तिला मंदिरात घेऊन गेले. यावेळी त्यांच्यासोबत तेज प्रतापची आई आणि बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी देखील उपस्थित होती. तिघांनी पटनामधील एका मंदिरात पूजा केली आहे. 

 

A post shared by Tej Pratap Yadav (@tejpratapyadavrjd) on

 

A post shared by Tej Pratap Yadav (@tejpratapyadavrjd) on

चांदी की सायकल, सोने की सीट.... सोशल मीडियावर या दोघांच्या हनीमूनची भरपूर चर्चा आहे. रिपोर्टनुसार, हे दोघे आता हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. पण हे हनीमूनसाठी नेमके कुठे गेले याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. असं म्हटलं जातं की, हे दोघे हनीमूनसाठी इंडोनेशियातील बाली येथे गेले असावेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close