एम.जे.अकबर यांचा प्रिया रमाणींविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी आज मुक्त पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

Updated: Oct 15, 2018, 11:00 PM IST
एम.जे.अकबर यांचा प्रिया रमाणींविरोधात अब्रूनुकसानीचा दावा title=

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी आज मुक्त पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. प्रिया रमाणींनी अकबरांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप #MeToo मोहिमेअंतर्गत केला होता. अकबर यांनी बिनबुडाचे आरोप म्हणून सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाय जाहीर माफी मागितली नाही, तर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता.

'खोटे आणि बिनबुडाचे आरोप'

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं अकबर यांचं म्हणणं आहे. निवडणुक वर्षामध्ये हे आरोप करण्यामागे छुपा उद्देश असल्याचा त्यांचा दावा आहे.

चौकशीचं आश्वासन

#MeToo मोहिम सुरू झाल्यापासून अकबर यांच्यावर ९ महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय.

या आरोपांची भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दखल घेत चौकशीचं आश्वासन दिलंय. तर विरोधकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे भाजपचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू, असे आश्वासनही दिले होते.

या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते रविवारी सकाळीच भारतात परतले. ते विमानतळावर येताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांची या आरोपांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण लवकरच याबाबत स्पष्टीकरण देऊ, असे सांगत तेथून काढता पाय घेतला होता.