१९७४ला करुणानिधींनी सुरु केली मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहणाची परंपरा

देशाचा ७२वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा झाला.

Updated: Aug 15, 2018, 08:19 PM IST
१९७४ला करुणानिधींनी सुरु केली मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहणाची परंपरा title=

चेन्नई : देशाचा ७२वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा झाला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केलं आणि यानंतर भाषण केलं. तर वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यांच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण केलं. पण १९७४ आधी राज्याचे मुख्यमंत्री ध्वजारोहण करायचे नाहीत. तामीळनाडूतल्या द्रमुख पक्षाचे अध्यक्ष दिवंगत एम. करुणानिधी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण केलं. १९७४ आधी राज्याचे राज्यपालच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करायचे.

१९७४ साली तामीळनाडूचे तत्कालिन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहिलं. प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान ध्वजारोहण करतात. मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी करुणानिधी यांनी या पत्रामध्ये इंदिरा गांधींना केली. तेव्हाच्या केंद्र सरकारनं करुणानिधी यांची ही मागणी स्वीकारली आणि त्यानंतर सगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करु लागले.