VIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला

महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 19, 2017, 04:05 PM IST
VIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला  title=

इंदूर : महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील एका जिममध्ये आरोपी तरुण हा तेथे उपस्थित असलेल्या तरुणीला छेडत होता. यानंतर त्रस्त झालेल्या तरुणीने याची तक्रार जिमच्या संचालकांना केली. 

आपली तक्रार केल्याने आरोपी तरुण चांगलाच संतापला. त्यांनतर त्याने त्या तरुणीला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याने लातही मारली. हा सर्व प्रकार जिममधील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

मारहाण केल्याने पीडित तरुणी जमिनीवर बसली. त्यानंतर तेथे उपस्थित लोक तिच्या मदतीला आले. आपल्या विरोधात परिस्थिती निर्माण होत असल्याचं पाहून आरोपीने तेथून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव पुनीत आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फूटेजही जप्त केलं आहे.