आसाराम बापू यांना किती वर्षांची होऊ शकते शिक्षा

आसाराम यांना किती वर्षांशी शिक्षा होणार...

Updated: Apr 25, 2018, 12:02 PM IST
आसाराम बापू यांना किती वर्षांची होऊ शकते शिक्षा title=

जोधपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी जोधपूरच्या विशेष न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवलं आहे. आसाराम यांच्या व्यतिरिक्त इतर 2 आरोपींना ही कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 2 जणांची निर्दोष सुटका झाली आहे. आसाराम यांच्यावर एससी-एसटी अॅक्ट आणि पॉक्सो अॅक्टसह 14 कलम लावण्यात आल्य़ा आहेत. आता आसाराम यांना किती वर्षांची शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 31 ऑगस्ट 2013 पासून आसाराम बापू जेलमध्ये आहे.

किती वर्षांची शिक्षा

पॉक्सो अॅक्टनुसार आसाराम यांना या प्रकरणात कमीतकमी 10 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पण आसाराम यांचं वय 78 वर्ष असल्याने त्यांना 10 वर्षाची शिक्षा दिली जाऊ शकते असं कायदे तज्ज्ञांचं मत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जोधपूर सेंट्रल जेलमध्येच सुनावणी झाली. संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 3 राज्यांमध्ये हायअलर्ट आहे.

इतर 2 आरोपी दोषी

आसाराम यांच्यासह शिल्पी उर्फ संचिता गुप्ता, शरदचंद्र उर्फ शरतचंद्र हे देखील या प्रकरणात दोषी ठरले आहेत. पीडितेच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी 7 एप्रिलला विशेष जज मधुसूदन शर्मा यांनी य़ा प्रकरणाची सुनावणी केली होती. 25 एप्रिलपर्यंत निर्णय त्यांनी सुरक्षित ठेवला होता. आसाराम यांच्यावर जोधपूरमधील आश्रमात राहणाऱ्या मुलीवर लैंगिक शोषणाचा आरोप होता.