मोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट...

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आदरातिथ्य करणार आहेत आणि तेही गुजरातच्या अहमदाबादमध्ये...

Updated: Sep 13, 2017, 01:21 PM IST
मोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट...  title=

अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आदरातिथ्य करणार आहेत आणि तेही गुजरातच्या अहमदाबादमध्ये...

मोदी - शिंजो भेटीदरम्यान हे दोन्ही समकक्ष नेते अहमदाबादमधील 'सिदी सईद मस्जिद'लाही भेट देणार आहेत. अर्थातच, पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात काही खास कारणामुळेच मोदींनी या मस्जिदची निवड केली असणार... अहमदाबदाच्या लाल दरवाजाच्या जवळच ही मस्जिद आहे.

सिदी सईद यांचा इतिहास

यमनहून भारतात आलेल्या सिदी सईद यांच्या नावावरून या मस्जिदचं नामकरण करण्यात आलंय. सिदी सईद यांनी सुलतान नसीरुद्दी महमूद (तिसरे) आणि सुलतान मुजफ्फर शाह (तिसरे) यांच्या दरबारात काम केल्याचे अनेक दाखले मिळतात.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, आफ्रिकेहून गुलाम म्हणून भारतात आलेल्या लोकांनी 'सिदी' म्हटलं जातं. परंतु, नंतर ते ताकदवान होत गेले. सिदी सईद यांना बादशाह अकबरानं 'अमीरुल हज' बनवून धाडलं होतं, असं सांगण्यात येतं.

ही मस्जिद बनवण्याचं काम हाती घेतलेल्या सिदी सईद यांचा १५८३ मध्ये मृत्यू झाला आणि या मस्जिदचं काम थांबलं... आजही ही मस्जिद त्याच अवस्थेत आहे. सईद यांचा दफनविधी इथंच पार पडला. परंतु, इथं कोणताही मकबरा नाही.  


नक्षीदार दगडी जाळ्या

नक्षीदार दगडी जाळ्या

मुघल काळात अहमदाबादमध्ये बनलेल्या सर्वात मोठ्या मस्जिदपैंकी ही एक मस्जिद असल्याचं सांगितलं जातं. १५७३ साली या मस्जिदचं निर्माण झालं होतं. याची खासियत म्हणजे या मस्जिदमध्ये दिसणाऱ्या नक्षीदार दगडी जाळ्या... लांबून त्या 'वन पीस' असल्याचं दिसतात... परंतु, छोटे छोटे तुकडे जोडून या जाळ्या बनवण्यात आल्याचं स्थापत्यकार सांगतात.