लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

Updated: Jun 21, 2017, 08:24 AM IST
लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं title=

लखनऊ : आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनीही यावेळी लखनऊच्या नागरिकांमध्ये सामील होऊन योगासनं केली. 55 हजार लखनऊ वासिय योगाभ्यासला हजर होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, रोजच्या जेवणात जसं मीठाला महत्त्व असत,तसच आपल्या जीवनात योगाचं महत्त्व आहे. योगाचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं महत्त्व मोदींनी विशद केलं.