'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा छुपा अजेंडा'

भारतीय संविधानात बदल करत भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांच्या अनुरुप केलं जायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

Updated: Sep 13, 2017, 03:36 PM IST
'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा छुपा अजेंडा'

नवी दिल्ली : भारतीय संविधानात बदल करत भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांच्या अनुरुप केलं जायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

यावर, सीपीआयएमचे महासचिव सीताराम येंचुरी यांनी जोरदार टीका केलीय. 'संविधानावर पुनर्विचार हा आरएसएसचा जन्मापासूनचा छुपा अजेंडा आहे' असं येचुरी यांनी म्हटलंय.  

संविधानातील खूप सारा भाग परदेशी विचारधारांवर आधारीत आहे आणि आज स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी त्यावर पुनर्विचार केला जायला हवा, असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. त्यांचं हेच विधान 'संविधानावर हिंदुत्वाच्या विचारांना लादण्याचा प्रयत्न' म्हणून पाहिलं जात आहे. 

भागवतांच्या भाषणामागचा हिडन अजेंडा हाच आहे. आपला भारत एक धर्म निरपेक्ष गणराज्य न राहता एक हिंदू राष्ट्र रुपात बदलला जावा, हाच आरएसएसचा उद्देश आहे, असं येचुरींनी म्हणत भागवतांवर जोरदार टीका केलीय.