मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार

मान्सून आता कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्यानं मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Updated: May 29, 2017, 08:33 AM IST
मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार title=

मुंबई : मान्सून आता कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्यानं मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच 30 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा सुरुवातीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानंतर अल निनोचा प्रभाव आणि बदलत्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सून 30 ऐवजी एक दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये दाखल होऊन पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पोहचणार आहे.

याच पार्श्वभूमीवर बळीराजाही कामाला लागला आहे. शेतक-यानं मशागतीची कामं पूर्ण करुन घेतली आहेत. काही जणांनी खरीपाची पेरणी केली आहे. तर काही जण पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करणार आहेत. मात्र सध्या तरी सा-यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.