मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Updated: May 27, 2017, 11:18 AM IST
मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

नवी दिल्ली : गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा भारतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आहे. दिल्लीमध्ये यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमाभागात पंजाब आणि राजस्थान हे देखील दहशतवाद्यांच्या निशान्यावर असल्याची माहिती आहे.

सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे की, २० ते २१ जणांना पाकिस्तानातून भारतात प्रवेश केला आहे. भारतात घुसल्यानंतर त्यांनी एकमेकांना छोट्या छोट्या समुहामध्ये वाटून घेतलं आहे. या सगळ्यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी ट्रेनिंग दिल्याचं बोललं जातंय.

पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी एक नोटीस जारी केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, हॉटेल आणि पर्यटनाच्या ठिकाणे, स्टेडियम, गर्दीची ठिकाणे या जागी सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अलर्टनुसार अशी शंका व्यक्त केली जात आहे की, दहशतवाद्यांना मोठा हल्ला करुन मीडियामध्ये चर्चेत यायचं आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने देखील काही दिवसांपूर्वी पाकिस्तान भारतात मोठ्या दहशतवादी कारवाईच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं.

नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. संशयित व्यक्तींवर नजर ठेवली पाहिजे. कोठेही कोणतीही अपरिचीत किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास त्याबाबत लगेचच पोलिसांना माहिती द्यावी. आपल्या आजुबाजुला नजर ठेवावी.