'निपाह व्हायरस'चा वाढता धोका; केरळमध्ये १६ जणांचा मृत्यू

 दरम्य़ान, या धोक्यावर तोडगा काढण्यासाठी केरळ सरकारने एका उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

Updated: May 22, 2018, 10:50 AM IST
'निपाह व्हायरस'चा वाढता धोका; केरळमध्ये १६ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: केरळमध्ये 'निपाह व्हायरस'चा धोका वाढत असून, या मृत्यूमुळे कोझिकोडमध्ये आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ लोकांचा समावेश आहे. तसेच, या १६ लोकांमध्ये एका नर्साच मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, या व्हायरसची लागण झालेल्या २५ लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. पुणे येथील वायरॉलॉजी इन्स्टिट्युटमध्ये तपासण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यात 'निपाह व्हायरस'चा अंश आढळल्याचे म्हटले आहे. दरम्य़ान, या धोक्यावर तोडगा काढण्यासाठी केरळ सरकारने एका उच्चस्तरीय समिती नेमली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात ज्या चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार निपाह या व्हायरसची लागण पक्षी आणि प्राण्याकडून माणसांना होते. या व्हायरसची लागण होताच माणूस आणि प्राणी दोघेही गंभीर आजारी पडतात.