१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल

१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 15, 2018, 06:21 PM IST
१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल  title=

नवी दिल्ली : १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांमुळे वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे.

१५ वर्ष जुनी वाहनं निकालात काढण्यासाठीच्या योजनेबाबत निती आयोगाशी चर्चा झाली आहे. या योजनेची लवकरच अंमलबजावणी होईल, असं गडकरी म्हणालेत.

भंगारापासून बनवणार वाहनांचे पार्ट्स

भारत वाहन उद्योगासाठी वाहनांचे पार्ट्स भंगारापासून बनवले जातील. यामुळे वाहनांसाठी लागणारा कच्चा माल स्वस्त मिळेल. भंगारात गेलेलं प्लास्टिक, रबर, अॅल्युमिनियम, तांब्याचा उपयोग वाहनांचे पार्ट्स बनवण्यासाठी वापरले जातील, असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच इथेनॉल आणि पेट्रोल दोघांवर चालणारी बाईक लॉन्च होईल असं गडकरींनी याआधीच सांगितलं आहे. प्रदूषण कमी होण्याबरोबरच महागड्या पेट्रोलला इथेनॉल हा पर्याय ठरू शकतो.