कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला

कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.

Shubhangi Palve Updated: Mar 14, 2018, 11:55 AM IST
कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला  title=

नवी दिल्ली : कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.

इतकंच नाही तर, 'जातीय दंगली काय असतात हे कळतंय का तुम्हाला? अशा प्रकरणात अटकपूर्व जामीन देता येत नाही' असं म्हणत न्यायालयानं एकबोटेंच्या वकिलांना चांगलंच फटकारलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्र सरकारचे वकील ॲड. निशांत कातनेश्वरकर यांनी काल कोर्टात ॲफिडेविट दाखल करून एकबोटेंचा अटकपूर्व जामीन नाकारण्याची विनंती केली होती... ती सर्वोच्च न्यायालयानं धुडकावून लावलीय.

त्यामुळे आता एकबोटेंना अटक करण्याचे मार्ग मोकळे झालेत. पोलीस कोणत्याही क्षणी एकबोटेंना अटक करू शकतील... मात्र आता ही अटक कधी होणार? याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय. 

का नाकारला जामीन अर्ज.... 

- महत्त्वाचं म्हणजे, मिलिंद एकबोटेंच्या विरोधात यापूर्वी असेच गुन्हे दाखल आहेत

- एकबोटे यांना मोबाईल जमा करण्याची विनंती केली. परंतु मोबाईल हरवला असल्याचे एकबोटे यांनी पोलिसांना सांगितलंय.

- एकबोटे यांच्यासोबत काही लोक होते. त्यांचा भीमा कोरेगांव दंगलीत सहभाग असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शांनी दिली आहे. परंतु ते लोक कोण आहेत, यासंदर्भात एकबोटे काहीच बोलत नाहीत... चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत...

या मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन नाकारलाय.