मोदी सरकारवर अविश्वास ठराव, कोणाला किती वेळ मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2018, 10:40 PM IST
मोदी सरकारवर अविश्वास ठराव, कोणाला किती वेळ मिळणार? title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर उद्या संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. यात सर्वाधिक वेळ हा सत्ताधारी भाजपला देण्यात आलाय. ३ तास ३३ मिनिटे बोलण्याची संधी ही भाजपला मिळणार आहे. तर काँग्रेसला ३८ मिनिटे देण्यात आलेय. या ३८ मिनिटांत काँग्रेसला आपली कमाल करुन दाखवावी लागणार आहे. दरम्यान, अविश्वास ठरावाच्यावेळी प्रश्नउत्तरांचा तास, लंच ब्रेक होणार नाही.

मॉनसून सत्र से गायब नहीं रह पाएंगे कांग्रेस सांसद, पार्टी ने ऐसे लगा दी सभी की 'ड्यूटी'

लोकसभेत मोदी सरकारविरोधात दि. २० जुलै रोजी विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव पटलावर मांडण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी लोकसभेत पक्षाच्यावतीने बोलणार आहेत. पीडीपीच्या अविश्वास ठरावाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय. त्याआधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलेय, विरोधकांकडे आकडा आहे. त्यामुळे सरकारला पराभूत केले जाईल. भाजपला ३ तास ३३ मिनिटे वेळ देण्यात आलेय. तर काँग्रेसला ३८ मिनिटे वेळ मिळणार आहे.

मोदी सरकार के खिलाफ विपक्ष लाया अविश्वास प्रस्ताव, अनंत कुमार बोले- 'अब होगा दूध का दूध, पानी का पानी'

लोकसभेत राजकीय पक्षांना त्यांच्या संख्येनुसार बोलण्यास वेळ दिली जाते. त्यामुळे भाजपला सर्वाधिक वेळ मिळालेय. दुसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसला ३८ मिनिटे मिळालेत. काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४८ आहे. अण्णा द्रमुक पार्टीची संख्या ३७ आहे. त्यामुळे त्यांना २९ मिनिटे वेळ देण्यात आलेय. तृणमूल काँग्रेसची संख्या ३४ आहे. त्यांना २७ मिनिटे तसेच बीजेडीला १५ मिनिटे, शिवसेनेला १४ तर ज्या पक्षाने अविश्वास ठराव दाखल केलाय त्या पक्षाला १३ मिनिटांचा वेळ देण्यात आलाय. टीआरएसला ९ तर सीपीएमला ७ आणि राष्ट्रवादीला ६ तर एलजेपीला ५ मिनिटांचा वेळ देण्यात आलाय.

शुक्रावीर सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावावर चर्चा सुरु होणार आहे. ही चर्चा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सलग सुरु राहणार आहे. भाजपकडून खासदार राकेश सिंग करतील. तर पीडीपीकडून अविश्वास ठराव देण्यात येईल. त्यानंतर पार्टीच्या नेत्यांची भाषणे होतील. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले म्हणणे मांडतील.

आज गुरुवारी बीजेडीचे खासदार जय पांडा यांचा राजीनामा स्विकारण्यात आलाय. त्यामुळे लोकसभेतील ११ जागा कमी जाल्यात. संसदेची संख्या ५३४ झाली आहे. यात अध्यक्ष आणि २ नामनिर्देशित व्यक्ती आहेत. भाजपची संख्या २७४ झाली आहे. अध्यक्ष यांच्यासह एनडीएची संख्या शिवसेना, राजू शेट्टी आणि अम्बुमणि रामदौस यांचा समावेश आहे. यांना आपल्या बाजुने वळविण्यात भाजपचे प्रयत्न आहेत. दरम्यान, काँग्रेस, पीडीपी, अण्णा द्रमुक, तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. तसा त्यांच्या पक्षाने व्हीप बजावलाय. तर शिवसेना मोदी सरकारच्या बाजुने कौल देणार आहे.