चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्‍कार

लिफ्ट घेतलेल्या एका महिलेचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 17, 2017, 12:58 PM IST
चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्‍कार title=
Representative Image

नवी दिल्ली : रस्त्यावर बस, रिक्षा किंवा टॅक्सी मिळत नसल्यास अनेकजण लिफ्ट मागतात. अशाच प्रकारे लिफ्ट घेतलेल्या एका महिलेचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी रात्री एक महिला आपल्या रोहिणी परिसरातील घरी जाण्यासाठी निघाली. ग्रीन पार्क येथे बसची वाट पाहत होती मात्र, खूप वेळ झाला तरी बस आलीच नाही.

त्यानंतर काही वेळाने त्या महिलेजवळ एक कारचालक आला आणि त्याने लिफ्ट देण्याची ऑफर दिली. मग, ही २९ वर्षीय महिलाही कारमध्ये बसून निघाली. मात्र, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार.

धौलाकुआं परिसरात कारचालकाने आपल्या आणखीन एका जोडीदाराला कारमध्ये बसवलं. मग, त्यांनी आपल्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवतं तिचं अपहरण केलं.

अपहरणकर्त्यांनी त्या महिलेचं अपहरण करत तिला ग्रेटर नोएडा परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी आरोपींनी त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा मोबाईल, दागिने आणि पैसे लुटून तिला अज्ञातस्थळावर फेकून दिलं.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर आणि आसपासच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.