नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला

देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 1, 2017, 09:40 PM IST
नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला title=

नवी दिल्ली : देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...

नोटबंदीमुळे रोख स्वरूपात होणाऱ्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले. त्यामुळे डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या १२ महिन्यांच्या कालावधीत क्रेडीट कार्डची रक्कम ३८.०७ टक्कांची वाढ झाली आहे. याच कालावधीत उर्वरीत एकूण रक्कम ही ५९,००० कोटी रूपये इतकी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही रक्कम ४३,२०० कोटी रूपये इतकी होती. दरम्यान, दोन वर्षांमध्ये क्रेडीट कार्डच्या रकमेत साधारण ७७.७४ टक्क्यांची वाढ झाली. सप्टेंबर २०१५मध्ये ही रक्कम ३३,७०० कोटी इतकी होती.

दरम्यान, क्रेडीट कार्डची संख्या वाढल्यामुळे बॅंका मात्र आनंदात आहेत. क्रेडीट कार्डवरून होणाऱ्या व्यवहारांवर ३,४९ टक्के प्रति महिना (४१.८८ टक्के प्रति वर्ष) इतके व्याज आकारले जाते. याचाच अर्थ असा की, बॅंकांच्या क्रेडीट कार्डची ५९,९०० कोटी रूपयांच्या उर्वरीत रकमेवर २०९० कोटी रूपयांचे व्याज मिळू शकले. यासोबतच बॅंकांना ठराविक रकमेवर १८ टक्क्यांचा वस्तु सेवा करसुद्धा (जीएसटी) मिळतो.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार देशात ऑगस्ट २०१६ मध्ये क्रेडीट कार्डची संख्या २.६४ कोटी इतकी होती. २०१७मध्ये हीच संख्या ३.२७ कोटींवर पोहोचली आहे.