आता दरमहिन्याला वाढेल सिलेंडरची किंमत, सबसिडी बंद होणार

केंद्र सरकार आता एलपीजी सिलेंडरवर सबसिडी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे.

Updated: Jul 31, 2017, 07:51 PM IST
आता दरमहिन्याला वाढेल सिलेंडरची किंमत, सबसिडी बंद होणार title=

नवी दिल्ली : केंद्र सरकार आता एलपीजी सिलेंडरवर सबसिडी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे.

सरकारने आधी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सबसिडीवाल्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 2 रुपयांनी वाढवण्यास सांगितले होते. आता सरकारने याची किंमत दुप्पट वाढवली आहे. त्यामुळे सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती लोकसभेत एक प्रश्नाला उत्तर देतांना दिलं. प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 12 सिलेंडर सब्सिडीसह मिळतात. त्यानंतर सिलेंडरवर सबसिडी मिळत नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून प्रति महिना सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी वाढविण्यासाठी अधिकार देण्यात आले होते. तेव्हापासून तेल कंपन्यांनी 10 वेळा एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवली आहे. सरकारने आता 1 जून 2017 पासून प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 4 रुपये वाढवण्यास सांगितले आहे. ही वाढ सबसिडी संपेपर्यंत सुरु राहिल. १८ मार्चला सबसिडी पूर्णपणे बंद होईल.

एक जुलैला एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी वाढली. गेल्या सहा वर्षात ही सर्वात जास्त वाढ आहे. सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरचे दिल्लीमध्ये सध्याचे दर 477.46 रुपये आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याची किंमत 419 .18 रुपये होते. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 564 रुपये आहे.