भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2017, 09:47 PM IST
भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट title=

नवी दिल्ली :  भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

यामुळे चीनच्या जळफळाटात वाढ होण्याची शक्यता आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सध्याही युद्धजन्य परिस्थीती आहे. व्हिएतनामकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनच्या विरोधात समुद्री सीमेवर तैनात केले जाऊ शकते. दक्षिणी चिनी समुद्रात हे दोन देश वारंवार एकमेकांसमोर आले आहेत.

त्यामुळे भारताची व्हिएतनामला मदत झाल्याचे कळताच चीन भारताविरोधातही आक्रमक होऊ शकतो. 

 एनडीटीव्हीने यासंबधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार व्हिएतनामसोबत असा काही व्यवहार झाला का, यावर भारताकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. 

 चीनविरोधात नेहमीच सहाय्य 

 चीन हा व्हिएतनाम आणि भारताचा सामाईक शत्रू आहे. त्यामूळे चीनच्या विरोधात भारताने नेहमीच व्हिएतनामला सहाय्य केल्याचे दिसून येते. भारताकडून व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्र देण्याबद्दलही विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. सोबतच सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांचे प्रशिक्षणही व्हिएतनामच्या सैन्याला भारताकडून दिले जाणार आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढविण्यात भारताला काही प्रमाणात यश येईल असे म्हटले जात आहे. 
 

 संरक्षण क्षेत्रात एकत्र

 व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ले थी गुरु हांग यांनी दोन्ही देश संरक्षण क्षेत्रातही एकमेकांसोबत काम करत असल्याचे सांगितले. तसेच ‘भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता, विकासासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य आहेत,’ असेही ते म्हणाले.