जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारा एक दहशतवादी ठार

पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जवानांकडून सर्च ऑपरेशन अजून सुरु आहे. उरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. ऑपरेशन दरम्यान जवानांनी शस्त्रे जप्त केली आहेत. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

Updated: Sep 26, 2017, 09:43 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारा एक दहशतवादी ठार  title=

श्रीनगर : पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जवानांकडून सर्च ऑपरेशन अजून सुरु आहे. उरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. ऑपरेशन दरम्यान जवानांनी शस्त्रे जप्त केली आहेत. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ला हाणून पाडला होता. सुरक्षादलांने एकूण ४ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. सोमवारी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला होता. जैश-ए-मोहम्मदचे हे दहशतवादी असल्याचं समोर आलं आहे. रविवारी देखील ३ दहशतवाद्यांना ठार केलं होतं.