आधार बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी उरलेत ३१ दिवस

आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

Updated: Dec 1, 2017, 08:11 AM IST
आधार बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी उरलेत ३१ दिवस title=

नवी दिल्ली : बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची...खुश है जमाना आज पहिली तारीख है...आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

उरलेत फक्त ३१ दिवस 

तुमच्या सर्व बँक खात्यांशी आधार नंबर जोडण्यासाठी आता फक्त ३१ दिवस उरलेत. जर तसं झालं नाही..तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पगार मिळणार नाही. आधार नंबर बँक खात्याशी जोडण्या साठी ३१ डिसेंबर २०१७ ही अतिंम तारीख आहे.

आधार जोडणे बंधनकारक

प्रत्येक बँक खात्याशी आधार जोडणे बंधन कारक आहे. तारखा पाळल्या नाही, तर बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या ३१ डिसेंबरला पार्टीला जाताना खात्याचा बँलन्स आणि खातं आधारशी जोडलं गेलय की याचीही शाहनिशा करुन मगच बाहेर  पडा. अन्यथा १ जाने मध्यरात्री फजिती होईल.

कसे जोडाल आधार?

आधार-बँक जोडणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बहुतांश बँकांनी आपल्या अँप्समध्ये ही सुविधा उपलब्ध असते. शिवाय तुमचे बँक ज्या शाखेत तिथेही आधार जोडणी शक्य आहे. ज्यांच्याकडे आधार नंबर नाही त्यांना तो काढता यावा यासाठी जवळपास सर्व सरकारी बँकानी प्रत्येक तालुक्यात किमान एका शाखात आधार नोंदणी सुरु केली आहे.