आज लोकसभा निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा मोदी सरकार- सर्व्हे

पाहा कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार

Updated: Dec 9, 2018, 05:37 PM IST
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा मोदी सरकार- सर्व्हे title=

नवी दिल्ली : भारतात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. सगळेच पक्ष आतापासून कामाला लागले आहेत. नुकताच 5 राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आता या 5 राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत उत्सूकता वाढली आहे. कारण या निकालांचं आगामी लोकसभा निवडणुकांवर देखील परिणाम होणार आहेत. नुकताच इंडिया टीवी-सीएनएक्सने घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार 543 लोकसभा जागांपैकी एनडीएला 281 जागा मिळू शकतात. तर यूपीएला 124 जागा तर अन्य 138 जागा जिंकू शकतात.

उत्तर प्रदेश

राज्यानुसार बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशच्या 80 लोकसभा जागांवर भाजपला 55 जागा मिळू शकतात. बीएसपीला 09 आणि सपाला देखील 09 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य 2 जागांवर निवडून येऊ शकतात. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या येथे काही जागा कमी होऊ शकतात.

महाराष्ट्र

लोकसभेच्या 48 जागांपैकी ओपिनियन पोलनुसार भाजपला 30, काँग्रेसला 05 तर शिवसेनेला 08 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादीला देखील 05 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल

लोकसभेच्या 42 जागा आहेत. येथे भाजपला 8 जागा, टीएमसीला 27 तर लेफ्टला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात.

बिहार

40 जागांपैकी भाजपला 15, आरजेडीला 10, जेडीयूला 9, काँग्रेसला 1 आणि इतरांना 5 जागा मिळू शकतात.

तमिळनाडू

एकूण 39 जागांपैकी भाजपला येथे एकही जागा नाही मिळणार तर काँग्रेसला येथे 3, एआयएडीएमकेला 14 तर डीएमकेला 17 जागा मिळू शकतात. तर इतर 05 जागांवर निवडून येतील.

कर्नाटक : 28 जागा

भाजप- 15, काँग्रेस - 9, जेडीएस - 4 जागा

गुजरात : 26 जागा

भाजप - 26, काँग्रेस - 00

आंध्र प्रदेश : 25 जागा 

भाजप - 01, टीडीपी - 08, वायएसआर - 16 जागा

नॉर्थ ईस्ट : 25 जागा

भाजप - 17, काँग्रेस - 00, लेफ्ट - 01, इतर - 07 जागा

ओडिशा : 21 जागा 

बीजेडी : 16, भाजप - 5

केरळ : 20 जागा 

भाजप - 01, काँग्रेस - 07, लेफ्ट - 07 इतर - 5

पंजाब : 13 जागा 

काँग्रेस 4 जागा, शिरोमणी अकाली दल - 08

हरियाणा : 10 जागा

भाजप - 08, काँग्रेस - 1 ओम प्रकाश चौटाला यांच्या पक्षाला 01 जागा

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये एकूण 65 लोकसभेच्या जागा आहेत. येथे भाजपला - 39, काँग्रेसला 26 तर जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये भाजपला 13 जागांचं नुकसान होतांना दिसत आहे. राजस्थानमध्ये 25 पैकी भाजपला 12 तर काँग्रेसला 13 जागा मिळू शकतात.

राजधानी दिल्लीमध्ये 7 जागांपैकी 7 ही जागा भाजला मिळू शकतात. आप आणि काँग्रेसला येथे धक्का बसू शकतो.

जम्मू-कश्मीरमध्ये 06 लोकसभेच्या जागांपैकी, भाजपला 02 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 01 तर नॅशनल कॉन्फ्रेंसला 02 आणि पीडीपीला 01 जागा मिळू शकतात.