भारतीय हद्दीत घुसलं पाकिस्तानचे हेलिकॉप्टर, भारतीय जवानांचा गोळीबार

भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच 

Updated: Sep 30, 2018, 03:02 PM IST
भारतीय हद्दीत घुसलं पाकिस्तानचे हेलिकॉप्टर, भारतीय जवानांचा गोळीबार title=

श्रीनगर : भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्ताननं आता भारताच्या हवाई सीमेचे उल्लंघन करत घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली आहे.

दुपारी १२.१३ वाजण्याच्या सुमारास पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घुसलं. ही बाब भारतीय लष्करी जवानांच्या लक्षात येताच त्यांनी प्रत्युत्तर म्हणून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर माघारी परतल्याची माहिती समोर आली आहे.