पाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका

  सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 14, 2018, 11:11 PM IST
पाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका title=

नवी दिल्ली :  सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत. 

येथील हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेबरोबरच लश्कर ए तोयबा असल्याचं समोर आलयं.

या पाकिस्तानी लष्कर पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याचेही स्पष्ट झाले.

पण आता एक वेगळीच भिती तोंड वर काढत आहे.

अण्वस्त्र हल्ला 

 पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने भारताला दिलीए.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी केवळ भारतातच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येही हल्ला करणार असल्याचं म्हटलं आहे. 

तणाव वाढणार 

येणाऱ्या दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक वाढणार असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख डेन कोट्स यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये सांगितले.