पेट्रोल-डिझेलचे दर घटले

सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.

Updated: Jun 19, 2017, 08:41 AM IST
पेट्रोल-डिझेलचे दर घटले

मुंबई : सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.

डिझेलच्या दरातही १३ पैशांनी घट झाला आहे. ५३ रुपये १७ पैशांवरुन डिझेल ५४ रुपये १ पैसे झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने म्हटलं आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती एकाच शहरात वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर वेगवेगळे देखील असू शकतात.