पेट्रोल-डिझेलसंदर्भातील ही बातमी उडवेल तुमची झोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 8, 2018, 01:25 PM IST
पेट्रोल-डिझेलसंदर्भातील ही बातमी उडवेल तुमची झोप title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीमध्ये डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ६० रुपयांचा आकडा पार केला आहे. तसेच पेट्रोलचे दरही ७० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईन कॉर्पोरेशननुसार, दिल्लीत डिझेलचे दर ६० रुपये प्रति लीटरहून अधिक झाले आहेत. २०१४ मध्ये डिझेलच्या किंमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्या. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत घट होत होती.

त्यावेळी सरकारने पेट्रोल-डिझेलवर उत्पाद शुल्क वाढवलं होतं जेणेकरुन आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या तर शुल्कात पुन्हा कपात करता येईल. 

दिल्लीमध्ये सोमवारी डिझेल ६०.४९ रुपये प्रति लिटरवर पोहोचले तर, पेट्रोलचे दर ७०.४३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

३ ऑक्टोबर २०१७ (७०.८८ रुपये प्रति लीटर) नंतर पेट्रोलचा हा दर सर्वाधिक आहे. त्या काळात मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पेट्रोलच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पाद शुल्कात दोन-दोन रुपये प्रति लीटरने कपात केली होती. मात्र, तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ सुरुच आहे.

डिझेलवर उत्पाद शुल्क ३८० टक्क्यांनी वाढवलं आहे. याच दरम्यान हा दर ३.५६ रुपयांहून १७.३३ रुपये प्रति लीटर झाला आहे. पेट्रोलच्या उत्पाद शुल्कात तब्बल १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये उत्पाद शुल्क ९.४८ पैसे होता जो सध्या २१.४८ रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या ब्रेंट क्रूडची किंमत ६७ डॉलर प्रति बॅरलच्यावर पोहोचली आहे. तर, २०१४ मध्ये हा दर ११५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता.