एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा कमी झाल्याचे पाहायला मिळतंय. 

Updated: Dec 7, 2018, 09:40 AM IST
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त title=

मुंबई : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा कमी झाल्याचे पाहायला मिळतंय. सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 39 ते 42 पैसे आणि डिझेल 42 ते 46 पैशांनी कमी झालंय. गुरूवारी राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोल 40 पैशांनी कमी होऊन 71.32 रुपये प्रति लीटर झालं तर डिझेल 43 पैशांनी स्वस्त होऊन 65.69 रुपये प्रति लीटर झालं. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.

Image result for petrol diesel zee news

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज पेट्रोल 76.90 रुपये प्रति लीटर दराने विकलं जातंय. तर बुधवारी हे दर 77.29    रुपये प्रति लीटर होते. मुंबईत डिझेल 46 पैशांनी स्वस्त होऊन 69.09 रुपये लीटर झालंय.

क्रूड तेल घसरलं

Image result for petrol diesel zee news

गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ही मोठी घसरण पाहायला मिळतेय.

जगामध्ये डब्ल्यूटीआय क्रूड आणि ब्रेंट क्रूड हे दोन प्रकारचे क्रूड उत्पादन होतं याबद्दल तुम्हाला माहिती असेल.

Image result for petrol diesel zee news

आजच्या व्यवहारात सकाळी डब्ल्यूटीआय 52.38 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड 61.11 डॉलर प्रति बॅरल असा व्यवहार सुरू होता.