भाजपच्या संसदीय बैठकीत मोदी आणि शहांचं जोरदार स्वागत

भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन सुरु आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 20, 2017, 10:42 AM IST
भाजपच्या संसदीय बैठकीत मोदी आणि शहांचं जोरदार स्वागत title=

नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन सुरु आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

हिमाचल आणि गुजरातच्या निकालानंतर भाजपची आज पहिलीच बैठक होत आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे बोलत आहेत.

भाजप अध्यक्षांनी संसदेच्या सदस्यांच्या बैठकीत पंतप्रधानांना लाडू खाऊ घातला आणि त्यांचं अभिनंदन केलं. गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. यावेळी पक्षाकडून संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचं अभिनंदन केलं.

पाहा व्हि़डिओ

गुजरातमध्ये 182 जागांपैकी 99 भाजप, 80 काँग्रेस आणि इतर 3 अशी गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल आहे. या वेळी गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच पक्षाच्या प्रमुख वर्तुळात मुख्यमंत्रीपदावर कोणता चेहरा बसवायाचा यावर चर्चा सुरू आहे.