पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.

Updated: Sep 13, 2017, 10:48 AM IST
पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.

एअरपोर्टपासून साबरमती आश्रमपर्यंत जवळपास ८ किलोमीटरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे रोड शो करणार आहेत. रोड शो दरम्यान २८ ठिकाणी ३० हून अधिक स्टेज बनवलेत. या स्टेजवरून वेगवेगळ्या राज्यांतील सांस्कृतीचं दर्शन घडणार आहे. साबरमती आश्रमात पोहचल्यानंतर दोन्ही नेते महात्मा गांधींना श्रद्धांजली देणार आहेत. साबरमती आश्रमात भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो अबे ऐतिहासिक सिदी सैयद मशिदीत जाणार आहेत.

शिंजो आबे यांच्या भारत दौ-यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी भारत आणि जपानमधील संबंध खुप महत्त्वाचे आहेत. दोन्ही देश वेगवेगळ्या क्षेत्रात आपले संबंध अधिक मजबूत करत आहेत असं सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो अबे मागील ३ वर्षात एकमेकांना १० वेळा भेटलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे गुरूवारी साबरमती रेल्वे स्टेशनजवळ अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमात १० हजाराहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. गुरूवारी भूमिपूजन झाल्यानंतर दोन्ही नेते १५ हून अधिक करारावर स्वाक्ष-या करणार आहेत.